पोलिस कर्मचाऱ्यास हवी मासे आणायला सुट्टी..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कर्मचाऱ्यास हवी 
मासे आणायला सुट्टी..!
पोलिस कर्मचाऱ्यास हवी मासे आणायला सुट्टी..!

पोलिस कर्मचाऱ्यास हवी मासे आणायला सुट्टी..!

sakal_logo
By

पुणे, ता. २ : ‘पुणे तिथे, काय उणे’ ही म्हण सर्वांनाच माहिती आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे! कारण खडक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने दोन दिवस सुट्टी मिळण्यासाठी वरिष्ठांना एक अनोखे कारण दिले आहे. सहकाऱ्याला चिलापी आणि रव मासे घेऊन यायचे आहे, असे नमूद करत त्याने सुट्टीसाठी वरिष्ठांना पत्र लिहिले आहे.

गेल्या ३० मे रोजी सुट्टीबाबत हे पत्र लिहिलेले असल्याचे समोर आले आहे. या वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट म्हणाले, ‘‘संबंधित कर्मचारी आमच्या पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. मात्र, असे पत्र माझ्यापर्यंत अद्याप आलेले नाही. सोशल मीडियावर मी ते पत्र पहिले आहे; पण कोणी खोडसाळपणा करतेय का हे तपासून बघू!’’ सुट्टी मिळवण्यासाठी वरिष्ठांना दिलेली काही भन्नाट कारणे आपण नक्कीच ऐकली असतील. मात्र, हे हटके कारण बुधवारपासून सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01835 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top