मटका अड्ड्यावर छापा; १३ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मटका अड्ड्यावर छापा; १३ जणांना अटक
मटका अड्ड्यावर छापा; १३ जणांना अटक

मटका अड्ड्यावर छापा; १३ जणांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः शुक्रवार पेठेतील महाराष्ट्र मित्र मंडळाजवळच्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेने छापा टाकून १३ जणांना अटक केली.
अतुल अरुण उमापती (वय ४०, रा. गुरुवार पेठ), सुहास संतोष दाखले, (वय २२, रा. तळजाई वसाहत), महादेव गौतम वोकेफोडे (वय ३३, रा. नीलकमल सोसायटी, बिबवेवाडी), भोलेनाथ राजू बनसोडे (वय २८, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड), इंद्रजित विनोद पाटील (वय ३३, रा. सदाशिवपेठ), निखिल मारुती मारणे (वय २७, रा. मारणेवाडी, ता. मुळशी), परशुराम चर्मकानी नाडर (वय ३१, रा. ताजमहल बिल्डींग, बुधवारपेठ), तुकाराम तानाजी मारणे (वय २९, रा. मारणेवाडी, ता. मुळशी), मंदार बंडोपंत काळे (वय ३२, रा. काळेवाडा, कसबापेठ), तुषार मिलिंद बहुले (वय २९, रा. उंडाचा गणपती), निखिल नंदकुमार क्षिरसागर (वय ३२, रा. कसबापेठ), ऋषिकेश दत्तात्रेय जाधव (वय ३४, रा. शुक्रवारपेठ) आणि फरार आरोपी नंदू नाईक असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
सिटी पोस्ट ऑफिसमागील क्रांती चौकातील एका इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबमध्ये तीन पत्ती जुगार पैशांवर बेकायदेशीर खेळत व खेळवित असल्याचे निदर्शनास आहे. त्यांच्याकडून ७७, ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02024 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top