बंगालच्या उपसागरात ‘मॉन्सून’ची प्रगती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंगालच्या उपसागरात ‘मॉन्सून’ची प्रगती
बंगालच्या उपसागरात ‘मॉन्सून’ची प्रगती

बंगालच्या उपसागरात ‘मॉन्सून’ची प्रगती

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) ईशान्य भारतातील काही भाग, तसेच बंगालच्या उपसागरात गुरुवारी प्रगती केली. मात्र, मॉन्सून राज्यात दाखल होण्यास वेळ लागेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मॉन्सूनने २९ मे रोजी केरळात प्रवेश केला. त्यानंतर मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला. आता मॉन्सूनचा महाराष्ट्राकडील प्रवास सुरू आहे. सध्या मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तमिळनाडूतील मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम आहे, तर गुरुवारी मॉन्‍सूनने ईशान्येकडील नागालॅँड, मणिपूर, मिझोराम राज्यात प्रवेश केला. तसेच, हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल काहीशी मंदावण्‍याची शक्यता आहे. मात्र, येत्या १० जूनपर्यंत मॉन्सून मुंबई आणि १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकते. जूनमधील पुढील काही दिवस मॉन्सूनचा जोर मात्र कमी राहू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02026 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top