
कसबा संस्कार केंद्राचा रविवारी वर्धापन दिन
पुणे, ता. २ : कसबा संस्कार केंद्राच्या ३७ व्या वर्धापनानिमित्त रविवारी (ता. ५) सकाळी १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कसबा पेठेतील श्री नामदेव शिंपी दैव मंदिर सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अनघा दिवाणजी, सारिका पाटणकर, पूर्वा ढोले, आर्या परदेशी, संदीप लचके, प्रीती नायकवडी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘कसबा’ गौरव पुरस्कार अष्टपैलू कलाकार वैष्णवी पाटोळे, राष्ट्रीय खेळाडू सार्थक चव्हाण यांना आणि ‘बाल गौरव’ पुरस्कार सिने नाट्य बालअभिनेता शर्व दाते याला प्रदान करण्यात येणार आहे. केंद्राचे संस्थापक अध्यक्ष स्वामी स्वरूपानंद सरस्वती, कसबा नगर संघप्रमुख प्रशांत यादव, भाजप पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट, माजी नगरसेवक योगेश समेळ आदी यावेळी उपस्थित असतील.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02088 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..