‘पोषण आहाराची कामे बचत गटांना द्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पोषण आहाराची कामे बचत गटांना द्या’
‘पोषण आहाराची कामे बचत गटांना द्या’

‘पोषण आहाराची कामे बचत गटांना द्या’

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : शालेय पोषण आहाराची कामे स्थानिक महिला बचत गटांना मिळावीत, अशी मागणी सावित्रीबाई फुले महासंघाच्या अध्यक्षा जयश्री ढोबळे, शाम ससाणे, सुनील जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

बचत गटांच्या उपजीविकेसाठी पोषण आहार हे महत्त्वाचे साधन होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकारने २०१९ मध्ये ते बंद केले. आता शालेय पोषण आहाराचे काम अनुभवी महिला बचत गटांना मिळावे, १३ मे च्या प्राथमिक शिक्षण संचालकाच्या परिपत्रकास तत्काळ स्थगिती द्यावी, सुधारित गुणतक्ता तयार करून महिला बचत गटांना काम मिळेल असा गुणदान तक्ता तयार करावा, आदी मागण्या ढोबळे यांनी केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास येत्या १० जूनपासून शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे व पुणे विभागीय आयुक्त कार्यालय यांवर बचत गटांकडून धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ससाणे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02090 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top