
पर्यावरण दिनानिमित्त पुणे पालिकेतर्फे प्लॉगेथॉन
पुणे, ता. २ : नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरणासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी महापालिकेने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘प्लॅागेथॉन’ हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाची ‘एशियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आशा राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहरातील विविध १२४ रस्ते, टेकड्या, नाले, ४५ उद्याने, नदीकाठ आणि घाट परिसर, वारसास्थळे आदी ठिकाणची स्वच्छता या उपक्रमात केली जाणार आहे. या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढवा आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमात शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, एनएसएस, एनसीसी, पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित, नेहरू युवा, समय नदी परिवार व अशा अनेक संस्था सहभागी होणार आहेत.
उपक्रमाची सविस्तर माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या https://www.pmc.gov.in/mr/plogathon-2022 या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच http://tellyigsunnplogiathon 2022 या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करून यामध्ये नागरिकांना सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत ८४ हजाराहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याचेही कानडे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02144 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..