पुणे परिसरात आज मेघगर्जनेची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे परिसरात आज मेघगर्जनेची शक्यता
पुणे परिसरात आज मेघगर्जनेची शक्यता

पुणे परिसरात आज मेघगर्जनेची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः शहर आणि परिसरात अधूनमधून अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यात गुरुवारी सकाळी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पुढील आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
गुरुवारी शहरात ३५.७ अंश सेल्सिअस, तर लोहगाव येथे ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या पुणे व परिसरात तापमानात काहीसे चढ-उतार पाहायला मिळत आहे. कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरणाची अनुभूती मिळत आहे. त्यात गुरुवारी सकाळी काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले. तसेच, कोंढवे धावडे, उत्तमनगर या परिसरात पावसाच्या सरी पडल्या. मात्र, उर्वरित ठिकाणी उन्हाचा ताप कायम होता. सायंकाळनंतर वारेही वाहत असल्याने वातावरणात गारवा पसरला. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. ३) शहर व परिसरात सायंकाळनंतर मेघगर्जनेची शक्यता आहे. शिवाय बुधवारपर्यंत (ता. ८) पुणे व परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहू शकते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02148 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top