‘स्पर्धात्मक योगासने’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्पर्धात्मक योगासने’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन
‘स्पर्धात्मक योगासने’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

‘स्पर्धात्मक योगासने’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : योगतज्ज्ञ डॉ. मनाली देव लिखित आणि सकाळ प्रकाशन प्रकाशित;''स्पर्धात्मक योगासने’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (ता. ५) होणार आहे. या प्रसंगी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर, पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, छत्रपती पुरस्कार विजेते राजीव जालनापूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धात्मक योगासनांवरील हे एक विशेष पुस्तक आहे. कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक योगासनांच्या प्रात्यक्षिकांनी होईल. यावेळी उपस्थितांसाठी अर्ध्या तासाची योगासन कार्यशाळाही होणार आहे. बाणेर रस्त्यावरील ‘सकाळ’नगरध्ये सिमॅसेस इंटरनॅशनल इंटरडिसिप्लिनरी लर्निग सेंटर (एसआयएलसी) येथे हा कार्यक्रम रविवारी (ता. ५) सकाळी ७. ३० वाजता होईल. ज्यांना आपला रविवार निरोगी आणि उत्साहीपद्धतीने सुरू करायचा आहे, त्यांनी कार्यक्रमात जरूर सहभागी व्हावे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02442 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top