गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती
गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती

गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : लोहगाव येथील वडिलोपार्जित जागेच्या वादातून भावकीतील कुटुंबावर प्राणघातक हल्ला करून जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आरोपाखाली विमानतळ पोलिस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिवाजी केरू खांदवे, सागर शिवाजी खांदवे, भरत शिवाजी खांदवे, ज्ञानेश्वर रामचंद्र खांदवे, पांडुरंग रामचंद्र खांदवे, सनी पांडुरंग खांदवे, रामचंद्र दौलत खांदवे (सर्व रा. लोहगाव) यांच्यासह चार महिलांवर पोलिस विमानतळ पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३) गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांच्या न्यायालयाने २ जून रोजी दुपारच्या सत्रात गुन्हा दाखल करण्यावर स्थगितीचा आदेश दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02503 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top