माजी नगरसेवक जगताप यांच्याविरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी नगरसेवक जगताप यांच्याविरोधात गुन्हा
माजी नगरसेवक जगताप यांच्याविरोधात गुन्हा

माजी नगरसेवक जगताप यांच्याविरोधात गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अन्नधान्य वितरण कार्यालयातील एका पुरवठा निरीक्षक महिला अधिकाऱ्याने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगताप त्यांच्या प्रभागातील नागरिकांचे शिधापत्रिकेचे काम घेऊन जुन्या जिल्हा परिषद कार्यालयातील अन्नधान्य वितरण कार्यालयात आले होते. त्यावेळी महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून नोकरी घालविण्याची धमकी दिली. जगताप यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांसमोर अपमानित केले, असे महिला अधिकाऱ्याने फिर्यादीत नमूद केले आहे. सरकारी कामात अडथळा तसेच विनयभंग केल्याप्रकरणी जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी जगताप यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02521 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top