
आंबेडकरी चळवळीत शेवाळे यांचे योगदान मोलाचे
पुणे, ता. ३ ः ‘‘रिपब्लिकन पक्षाला एकत्र ठेवण्यामध्ये शेवाळे सरांचा वाटा मोठा होता. शेवाळे सरांनी मला तीस वर्षे एकनिष्ठ साथ दिली. त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन पक्षाचा शिलेदार हरवला आहे," अशी भावना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे यांचे नुकतेच निधन झाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना, संस्था यांच्यातर्फे अभिवादन सभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी खासदार गिरीश बापट, आमदार सुनील कांबळे, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, माजी मंत्री अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, माजी आमदार उल्हास पवार, ॲड. जयदेव गायकवाड, दिलीप कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भूपेश थुलकर, राजाभाऊ सरोदे, ‘रिपाइं’ प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर,आदी उपस्थित होते.
प्रा. कवाडे म्हणाले, ‘‘केवळ श्रद्धांजली सभेला एकत्र न येता इतर वेळीसुद्धा रिपब्लिकन पक्षातील लोक ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी शेवाळे सरांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.’’
बापट म्हणाले, ‘‘अभिवादन सभेसारखे कार्यक्रम मनाला वेदना देणारे असतात. आयुष्यभर समाजासाठी काम, कार्यकर्ते घडविण्याची धडपड, कायम पक्षाची चिंता शेवाळे सर करत असत.’’ डॉ. राजेंद्र गवई, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, उल्हास पवार यांच्यासह रिपब्लिकन चळवळीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शेवाळे सरांच्या विषयी भावना व्यक्त केल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02547 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..