येरवड्यात आठ लाखांचे अमली पदार्थ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येरवड्यात आठ लाखांचे अमली पदार्थ जप्त
येरवड्यात आठ लाखांचे अमली पदार्थ जप्त

येरवड्यात आठ लाखांचे अमली पदार्थ जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मेफेड्रॉन या अमली पदार्थाची विक्री करताना अटक केली आहे. ही कारवाई गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक १ ने केली.
समीर ऊर्फ आयबा शहाजहान शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे. येरवडा पोलिस ठाण्याच्या परिसरात पर्णकुटी पायथा दरबार बेकरी समोरील रस्त्यावर शेख संशयितरीत्या फिरत असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्याकडून ७ लाख ८१ हजार ३५० रुपये किमतीचे ५२ ग्रॅम ९० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अमली पदार्थ, ५ हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा आणि इतर असा एकूण ७ सात ८८ हजार ३५० रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02673 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top