इतिहास बदलणाऱ्या प्रवृत्तींविरोधात उभे राहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहास बदलणाऱ्या प्रवृत्तींविरोधात उभे राहा
इतिहास बदलणाऱ्या प्रवृत्तींविरोधात उभे राहा

इतिहास बदलणाऱ्या प्रवृत्तींविरोधात उभे राहा

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : ‘प्राचीन, मध्य, ब्रिटीशकाळ असो वा वर्तमानकाळ महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा देण्याचे काम केले. सामाजिक न्यायाबरोबरच देशाला संविधान या राज्याने दिले. आज सत्तेसमोर सगळे नतमस्तक होत असताना देशाचा इतिहास बदलू पाहणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रातील तरूणांनी उभे राहावे,’ असे आवाहन कॉंग्रेसचे युवा नेते कन्हैय्या कुमार यांनी केली.

‘कनेक्ट महाराष्ट्र कॉन्क्लेव्ह २०२२’ निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘लोकतंत्र’ या विषयावर कुमार बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार रोहित पवार उपस्थित होते. या कॉन्क्लेव्हसाठी राज्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होता. कन्हैय्या कुमार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करतानाच पुरोगामी महाराष्ट्रातील तरूणांनी देशाला दिशा दाखविण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
कन्हैय्या कुमार म्हणाले,‘‘ लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेवर येऊन एकाधिकारशाही निर्माण केली जात आहे. आपआपसात भांडणे लावून आपली पोळी भाजप घेण्याचे काम केले जात आहे. प्रश्‍न विचारला की देशद्रोही ठरविले जात आहे. इतिहास बदलण्याचे काम केले जात आहे. महागाई, बेरोजगारी यावर कोणतीही बोलायला तयार नाही. प्रश्‍न विचारणे हा तुमचा अधिकार आहे. तो तुम्ही जिवंत ठेवा’’

त्यांनी जे स्वप्न दाखविले होते, ते प्रत्यक्षात आले का, अच्छे दिन आले का, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या का, तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये आले का, असा प्रश्‍न करून कन्हैय्या कुमार म्हणाले,‘‘ जनतेला अच्छे दिन आले नाही परंतु भाजपला आले. लोकांच्या खात्यात पंधरा आले नाही, परंतु भाजपच्या खात्यात पाच हजार कोटी आले. वर्षभरात ८ लाख नागरीकांनी या देशाचे नागरिकत्व सोडले. वर्षभरात एक लाख लोकांनाही नोकऱ्या मिळाल्या नाही. काश्मीर फाइल चित्रपट बघायला वेळ आहे. परंतु काश्मीरमध्ये ज्या हत्या होत आहेत, त्यावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना बोलायला वेळ नाही.’’

जितेंद्र आव्हाड म्हणाले,‘‘ एक वेगळ्या प्रकारचे युद्ध देशात सुरू झाले आहे. सर्व मीडिया एका व्यवस्थेच्या हातात गेला आहे. त्यामुळे हे मोठे आव्हान तुमच्या आमच्या समोर आहे. ही लढाई एक होऊन लढावी लागणार आहे. ती लढतानाही त्रास होईल, बदनाम केले जाईल. परंतु त्यांची पर्वा करू नका.’’

हार्दिक पटेल आता नेते झाले!

राणा दांपत्यावरही कन्हैय्या कुमार यांनी नाव न घेता टीका केली. ते म्हणाले,‘‘जेव्हा मनात भीती असेल तेव्हा किंवा सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर हनुमान चालिसा म्हटली जाते. परंतु कोणा नेत्याच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीस म्हणजे हा राजकारणाचा भाग आहे.’’ तर हार्दीक पटेल यांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले,‘ व्यक्ती महत्त्वाची नाही, तर विचार महत्त्वाचे आहेत. व्यक्ती हतबल होऊ शकते, पण विचार नाही. पटेल हे युवकांचे आयकॉन होते. आता ते नेते झाले.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02774 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top