
‘वसंतदादा शुगर’चे विदर्भात उपकेंद्र
पुणे, ता. ४ ः पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र मराठवाड्यापाठोपाठ विदर्भातही सुरु करण्यात येईल, अशी घोषणा या संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी केली.
पुण्यातील राज्यस्तरीय साखर परिषदेच्या उद्घघाटन समारंभात अध्यक्षीय भाषणात ते बोलत केली. या नव्या उपकेंद्रामुळे ‘वसंतदादा शुगर’चे राज्यात दोन उपकेंद्र होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीवरून विदर्भात हे उपकेंद्र सुरु करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले.
याआधी मराठवाड्यातील नागरिकांनी त्यांच्या भागात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. तेथील नागरिकांच्या मागणीवरून जालना जिल्ह्यात ‘वसंतदादा शुगर’चे राज्यातील पहिले उपकेंद्र सुरु केले आहे. नितीन गडकरी हे शनिवारी पुण्यातील राज्यस्तरीय साखर परिषदेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. हा समारंभ सुरु होण्यापूर्वी गडकरी यांनी विदर्भात ‘वसंतदादा शुगर’चे उपकेंद्र सुरु करण्याची मागणी केली आणि या उपकेंद्रासाठी हवी असणारी ११० एकर जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याचे पवार यांनी सांगितले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष या नात्याने नितीन गडकरी यांची मागणी मान्य करत आहे. त्यांच्या मागणीनुसार या संस्थेचे राज्यातील दुसरे उपकेंद्र विदर्भात सुरु करण्यात येणार आहे. यासाठी गडकरी यांनी उपलब्ध करून दिलेल्या जमिनीचा मोबदला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने दिला जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02819 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..