
पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे शुक्रवारी आयोजन
पुणे, ता. ६ : ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मुंबई आणि एन्व्हार्न्मेन्टल क्लब ऑफ इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. १०) पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अशी माहिती ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सदस्य अमोद घमंडे आणि एन्व्हार्न्मेन्टल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अॅड. अनिरुद्ध कुलकर्णी, दत्तात्रेय देवळे, मुकुंद परदेशी उपस्थित होते.
चॅलेंजेस ऑफ एन्व्हार्न्मेन्ट प्रोटेक्शन इन स्मार्ट इंडिया या विषयावर ही कार्यशाळा नवलमल फिरोदिया हॉल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03331 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..