अकृषिक कराच्या फेररचनेसाठी समिती राज्य सरकारचा निर्णय; महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकृषिक कराच्या फेररचनेसाठी समिती
राज्य सरकारचा निर्णय; महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव अध्यक्ष
अकृषिक कराच्या फेररचनेसाठी समिती राज्य सरकारचा निर्णय; महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव अध्यक्ष

अकृषिक कराच्या फेररचनेसाठी समिती राज्य सरकारचा निर्णय; महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव अध्यक्ष

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : अकृषिक कराचे (एनए टॅक्‍स) दर आणि त्याच्या आकारणीची फेरविचार करण्यासाठी राज्य सरकारने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. अकृषिक प्रमाणदराच्या आधारे कर आकारणीस दिलेली स्थगिती उठविणे व त्यासंदर्भातील अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्याविषयी ही समिती अभ्यास करणार असून त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर करणार आहे.

गावठाण क्षेत्र वगळता पुणे शहरातील समाविष्ट गावातील सर्व गृहनिर्माण सहकारी सोसायटी आणि वाणिज्य व औद्योगिक वापर करणाऱ्या आस्थापनांना अकृषिक कर भरणे बंधनकारक आहे. शहरातील उपनगर परिसरातील शेत जमिनींचे बिनशेती जमिनीत (एनए) रूपांतर करून त्यावर मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्या उभारण्यात आल्या आहेत. या सोसायट्यांनी दरवर्षी अकृषिक कर भरणे आवश्‍यक आहे. परंतु, अनेक सोसायट्यांकडे या कराची थकबाकी आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर सरकारने अकृषिक कर आकारणीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी महसुल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. यात जमाबंदी आयुक्त, नाशिक व कोकण विभागाचे विभागीय आयुक्त हे सद‌स्य, तर महसुल व वन विभागाचे सहसचिव हे सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचे परिपत्रक महसुल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी काढले आहे.

सोसायट्यांसमोर थकबाकीचा प्रश्न
जिल्हा प्रशासनाने मध्यंतरी थकबाकी असलेल्या सोसायट्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. अनेक वर्ष हा कर न भरल्यामुळे सोसायट्यांच्या थकबाकीची रक्कम मोठी आहे. या हा कर कसा भरावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. यासंदर्भात विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. या वेळी अकृषिक कर वसुलीस पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03570 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top