मुलीवर गोळी झाडणाऱ्याच्या कोठडीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीवर गोळी झाडणाऱ्याच्या कोठडीत वाढ
मुलीवर गोळी झाडणाऱ्याच्या कोठडीत वाढ

मुलीवर गोळी झाडणाऱ्याच्या कोठडीत वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : पती-पत्नीत झालेल्या वादात स्वतःच्या मुलीवर गोळी झाडणाऱ्या वडिलांच्या पोलिस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पांडुरंग तुकाराम उभे (वय ३८) असे कोठडीत वाढ करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. गोळीबारात उभे याची आठ वर्षांची मुलगी जखमी झाली. २३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता नऱ्हे परिसरात ही घटना घडली. उभे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. घटनेच्या दिवशी वाद झाल्यानंतर उभे यांनी पिस्तूल काढून ते पत्नीवर रोखून धरले. तेव्हा ‘नको पापा असे करू नका’, म्हणत मुलगी हात जोडून विनवणी करत होती. उभे याने पिस्तुलातून तिच्यावर गोळी झाडून तीला गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने उभे याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी उभे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील गिरीश बारगजे यांनी केली.