पॅन्ट्रीकार रेल्वेच्या रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Pantrycar
पॅन्ट्रीकार रेल्वेच्या रडारवर

पॅन्ट्रीकार रेल्वेच्या रडारवर

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या बहुतांश गाड्यांतील ‘पॅन्ट्रीकार’मध्ये तपासणी दरम्यान अस्वच्छता आढळून आली. तसेच त्यांतील खाद्यपदार्थही निकृष्ट असल्याचे आढळले. यामुळे रेल्वे प्रशासनाने पॅन्ट्रीकार चालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयाचा दंड वसूल केला. तसेच, अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई केली.

काही दिवसांपासून प्रवाशांकडून पॅन्ट्रीकारमधील खाद्यपदार्थांविषयी तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून स्थानकातून धावणाऱ्या विविध गाड्यांमधील पॅन्ट्रीकारची तपासणी मोहीम हाती घेतली. यात सुमारे १७ गाड्यांमधील पॅन्ट्रीकारची पाहणी केली. यात अस्वच्छता व खाद्यपदार्थांचा दर्जा निकृष्ट आढळल्याने १५ पॅन्ट्रीकार चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यात आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-पटणा एक्स्प्रेस, पुणे-दरभंगा एक्स्प्रेस, पुणे-वाराणसी ज्ञानगंगा एक्स्प्रेस आदी गाड्यांमधील पॅन्ट्रीकार चालकांचा समावेश आहे.

कारवाई का झाली?

  • पॅन्ट्रीकारमध्ये आढळून आलेली अस्वच्छता

  • खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे घेणे

  • ठरवून दिलेल्या वजनात घट करणे

  • खाद्यपदार्थांचा दर्जा निकृष्ट असणे

प्रवाशांना चांगल्या दर्जाचे आणि रेल्वेने ठरवून दिलेल्या दरात खाद्यपदार्थ मिळणे गरजेचे आहे. मात्र, काही गाड्यांमधील पॅन्ट्रीकार चालकांकडून याचे उल्लंघन केले जात होते. यामुळे दोषी चालकांवर ही कारवाई करण्यात आली.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे विभाग, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f13575 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top