पुणेकरांना शास्त्रीय गायनाची मेजवानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांना शास्त्रीय गायनाची मेजवानी
पुणेकरांना शास्त्रीय गायनाची मेजवानी

पुणेकरांना शास्त्रीय गायनाची मेजवानी

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः मांगल्याचे प्रतीक असलेल्या दिवाळीच्या दिवसाची सुरवात यंदा शास्त्रीय गायनाच्या सुरेल मैफलीने होणार आहे. पुणेकरांना यंदाच्या दिवाळीतही सुरेल स्वरांची साथ मिळावी, यासाठी ‘सकाळ’तर्फे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे पुणेकरांना दोन दिवस या कार्यक्रमाचा आनंद लुटता येणार आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सोमवारी (ता. २४) आणि बुधवारी (ता. २६) हा कार्यक्रम रंगणार आहे. दोन्ही कार्यक्रम पहाटे साडेपाच वाजता सुरू होणार आहेत. या दोन दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत गायक राहुल देशपांडे आणि जयतीर्थ मेवुंडी व सावनी शेंडे यांच्या सुरेल स्वरांची मैफल रंगणार आहे. पहाटेच्या प्रसन्नवेळी अशा शब्द सुरांच्या संगीतमय मैफलीने पुणेकरांची दिवाळी पहाट प्रसन्न होईल.
नरकचतुर्दशीच्या दिवशी म्हणजे सोमवारी राहुल देशपांडे यांच्या गायनाचा सुरेल नजराणा मिळणार असून यामध्ये निखिल फाटक (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), अभिजित हिरे (ऑक्टोपॅड), अतुल रनिंग (कीबोर्ड) आणि मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम) हे साथसंगत करणार आहेत. पाडव्याच्या दिवशी बुधवारी गायक जयतीर्थ मेवुंडी व सावनी शेंडे यांच्या स्वरांनी पहाट सजणार आहे. त्यामध्ये अभिनय रवंदे (हार्मोनिअम), पांडुरंग पवार (तबला) आणि सुखद जाधव (पखवाज) हे विविध वाद्यांवर साथसंगत करणार आहेत.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’ आहेत. पावर्ड बाय रावेतकर ग्रुप आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आहेत. तर या कार्यक्रमाचे सह-प्रायोजक हे सुप्रिम रिॲलिटी आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. त्यासाठीच्या मोजक्याच प्रवेशिका उपलब्ध आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेशिका दिल्या जातील.

मोजक्या प्रवेशिका उपलब्ध
कधी मिळणार प्रवेशिका ः बुधवारपासून (ता. १९)
प्रवेशिका मिळण्याची वेळ ः सकाळी ११ ते संध्याकाळी ५
ठिकाण ः ‘सकाळ’, बुधवार पेठ कार्यालय