Career : योग्य करिअर निवडीसाठी बुद्धिमापन चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Career
योग्य करिअर निवडीसाठी बुद्धिमापन चाचणी

Career : योग्य करिअर निवडीसाठी बुद्धिमापन चाचणी आवश्यक

पुणे : करिअर निवड हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो. त्यात चूक होऊ नये, यासाठी पालक आणि विद्यार्थी जागरूक असतात. करिअरमध्ये यश मिळवायचे असेल, तर पाया भक्कम लागतो. हा मजबूत पाया बुद्धिमापन चाचणीमुळे तयार होतो.
करिअर निवडीचे मार्ग अनेकदा सरधोपट निवडले जातात. मुलांना चांगले गुण पडत असतील, तर विज्ञानात जाऊन पुढे डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे. पण अनेकदा मुलांचा कल वेगळा असू शकतो. यासाठी बुद्धिमापन चाचणी उपयोगी ठरू शकते. मुलांचा कल नेमका काय आहे, त्यांना कोणत्या विषयात गती आहे, हे समजून घेऊन त्यानंतर करिअर निवड केली गेली, तर यशस्वी आणि सुखी होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे केवळ शालेय गुणांवर हा निर्णय न घेता शास्त्रोक्त बुद्धिमापन चाचणी घेऊन मगच तो करावा.

‘नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायकॉलॉजी’तर्फे देशातील १३ शहरांतील ८८ शाळांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात ६ हजार ५३० विद्यार्थ्यांची भाषिक-शाब्दिक कौशल्ये, गणिती-तांत्रिक कौशल्ये आणि तार्किक कौशल्ये तपासली गेली. कल आणि करिअर निवड यांच्यातील तफावत दाखविणारी ठळक बाब यातून समोर आली. बुद्धिमापन चाचणीतून सरासरी ७५ टक्के गुणांकांसह आर्किटेक्चर क्षेत्राकडे कल असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही ४५ विद्यार्थ्यांनी आर्किटेक्चर या क्षेत्रास करिअर निवडीसाठी शून्य रेटिंग केले होते. याउलट बुद्धिमापन चाचणीत सरासरी ४५ टक्क्यांहून कमी गुणांक घेत आर्किटेक्चर क्षेत्राकडे कल नसल्याचे स्पष्ट दिसत असतानाही ८० विद्यार्थ्यांनी आर्किटेक्चर या क्षेत्रास करिअर निवडीसाठी सर्वाधिक पाच असे रेटिंग दिले होते. कल आणि करिअर निवड यांतील तफावत या सर्वेक्षणातून स्पष्ट दिसून येते.

करिअर निवडीचे पाच निकष
करिअरची निवड करताना खालील पाच मुद्द्यांचा विचार होणे आवश्यक असते. याची सुरुवात बुद्धिमापन चाचणीपासून होते. बौद्धिक क्षमता आणि कल एकदा लक्षात आला, की करिअरचा प्रवास सुरू करता येतो.

कल परिचय

आपल्या पाल्याने नेमके कोणते करिअर निवडावे, याविषयी पालकांच्या मनात संभ्रम असतो. कल काय आहे, हे समजले की हा गोंधळ कमी होतो. त्यामुळे कल परिचय अतिशय महत्त्वाचा असतो.

पर्याय

करिअर कोणत्या क्षेत्रांत करता येऊ शकते, याची माहिती पाल्यांना असणे आवश्यक आहे. अनेकदा पालकांनाही करिअरच्या इंजिनिअरिंग, मेडिकल इत्यादी क्षेत्रांव्यतिरिक्त इतर क्षेत्रांची विशेष माहिती नसते.

निवड

कल परिचय होऊन करिअरच्या पर्यायांविषयीची माहिती मिळाली, की करिअर निवड करणे सोपे जाते. करिअरच्या उत्तम संधी असणारी अनेक उपक्षेत्रे आज उपलब्ध आहेत.

शिक्षण

कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे निश्चित झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण कुठे मिळू शकते, याचा शोध घेणे विद्यार्थी आणि पालकांना सोपे जाते.

समाधान

करिअर निवडीत जसे आर्थिक स्थैर्य आवश्यक असते, त्याचप्रमाणे आपण करत असलेल्या कामातून मिळणारा आनंद आणि समाधानही गरजेचे असते.

बुद्धिमापन चाचणी करिअर निवडीचा पाया

करिअर निवडीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत, असे मत ‘नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायकॉलॉजी’ने नोंदविले आहे. करिअरची निवड ही विद्यार्थ्यांच्या कलेनुसारच व्हावी व पालकांची सामाजिक-आर्थिक स्थिती ही दुय्यम बाब असावी. तसेच पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बुद्धिमापन चाचणी आणि करिअर मार्गदर्शन या दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

“Register for a free Aptitude Test at a center close to you “