अनुसूचित जाती-जमातीचे प्रभाग जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुसूचित जाती-जमातीचे प्रभाग जाहीर
अनुसूचित जाती-जमातीचे प्रभाग जाहीर

अनुसूचित जाती-जमातीचे प्रभाग जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : महापालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गासाठी कोणते प्रभाग आरक्षीत असणार याची यादी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यामध्ये दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी, तर २३ प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षीत असणार आहेत.

महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागात तीन सदस्य असणार आहेत. नगरसेवकांची संख्या १७३ इतकी असणार आहे. ५८ प्रभागांपैकी ५७ प्रभाग तीन सदस्यांचे व एक प्रभाग दोन सदस्यांचा असणार आहे. निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर परिशिष्ट जाहीर केले आहे. त्यामध्ये २०११ ची ३५ लाख ५६ हजार ८२४ लोकसंख्या गृहीत धरली आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची ४ लाख ८० हजार १७ तर, अनुसूचित जमाती लोकसंख्या ४१ हजार ५६१ आहे. त्यानुसार २३ प्रभाग अनुसूचित जाती, तर दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत केले आहेत.

अ आणि ब जागा आरक्षीत
तीन सदस्यांचा प्रभागाची विभागणी अ, ब आणि क अशी केली आहे. त्यामध्ये संबंधित प्रभागातील अ जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षीत असेल तर ब जागा ही जमातीसाठी आरक्षीत केली आहे. अनुसूचित जातीच्या २३ पैकी १२ जागा व अनुसूचित जागेची एक जागा जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल, असे निवडणूक शाखेचे उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी सांगितले.


हे आहेत आरक्षीत प्रभाग
अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक - प्रभागाचे नाव 
१ - धानोरी-विश्रांतवाडी
१४ - पाषाण- बावधन बुद्रूक

अनुसूचित जाती
प्रभाग  क्रमांक - प्रभागाचे नाव
१ - धानोरी-विश्रांतवाडी
३ - लोहगाव-विमाननगर
४ - पूर्व खराडी-वाघोली
७ - कल्याणीनगर-नागपूर चाळ
८ - कळस-फुलेनगर
९ - येरवडा
१० -शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी
११ -बोपोडी-पुणे विद्यापीठ
१२ - औंध-बालेवाडी
१९ - छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम-रास्ता पेठ
२० - पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता
२१ - कोरेगाव पार्क-मुंढवा
२२ - मांजरी बुद्रूक.-शेवाळेवाडी
२६ - वानवडी गावठाण-वैदुवाडी
२७ -कासेवाडी-लोहियानगर
३७ -जनता वसाहत-दत्तवाडी
३८ - शिवदर्शन-पद्मावती
३९ - मार्केट यार्ड-महर्षीनगर
४२ - रामटेकडी-सय्यदनगर
४६ - महंमदवाडी-उरुळी देवाची
४७ - कोंढवा बुद्रूक -येवलेवाडी
४८ - अप्पर-सुपर इंदिरानगर
५० - सहकारनगर-तळजाई