राज्यात वादळी पावसाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात वादळी पावसाचा इशारा
राज्यात वादळी पावसाचा इशारा

राज्यात वादळी पावसाचा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः राज्यातील कमी दाबाचा पट्टा, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र या पोषक प्रणालीमुळे राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पाऊस सुरू आहे. रविवारी (ता. ११) पूर्व विदर्भासह, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात मध्यम ते जोरदार पावसासह उन्हाचा चटका, उकाडाही कायम असल्याचे चित्र आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. रविवारी (ता. ११) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

पुण्यात ढगाळ वातावरण

मागील दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र या काळातही ढगाळ हवामान कायम होते. शनिवारी (ता.१०) दिवसभर आकाश अंशतः ढगाळ होते. दिवसभर जोरदार सरी पडल्याची नोंद नाही. रविवारीही (ता.११) आकाश सामान्यतः ढगाळ आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यातही ही स्थिती कायम राहणार असून, घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22g07013 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..