पुणेकरांमधील संवेदनशीलतेचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांमधील संवेदनशीलतेचे दर्शन
पुणेकरांमधील संवेदनशीलतेचे दर्शन

पुणेकरांमधील संवेदनशीलतेचे दर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : सगळे रस्ते बंद...सर्वत्र विसर्जन मिरवणुकीची तुडूंब गर्दी, त्यातही टिळक चौक गर्दीच्या महासागरात बुडालेला... मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीसाठी लाखो भाविक थांबलेले... ढोल- ताशाच्या तालावर तरुणाई थिरकत असतानाच ५ वाजून ४८ मिनिटांनी लक्ष्मी रस्त्यावरून एक रुग्णवाहिका सायरन वाजवित गर्दीतून वाढ काढत येत होती... हे दृश्य पाहून लोक बाजूला हटू लागले... स्टेजवरूनही घोषणा करण्यात आली...परिणामी इतक्‍या गर्दीतूनही अवघ्या काही सेकंदात रुग्णवाहिका टिळक चौकातून पुढे निघून गेली... हे घडले ते केवळ संवेदनशील पुणेकरांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे.

विसर्जन मिरवणुकीमध्ये टिळक चौक केंद्रस्थानी असतो. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता व कुमठेकर रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता असे ५ रस्ते टिळक चौकात एकत्र येतात. साहजिकच या चौकात मानाच्या व प्रमुख मंडळांच्या ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. शुक्रवारी सकाळपासूनच हा चौक गर्दीने अक्षरशः फुलला होता. मानाचा पहिला कसबा गणपती ३ वाजता चौकातून मार्गस्थ झाला. त्यापाठोपाठ तांबडी जोगेश्वरी व लगेच मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीसाठी ढोल ताशा पथक टिळक चौकात पोचले. दुरून गुरुजी तालीम मंडळांच्या ‘श्रीं’चे दर्शनही होऊ लागले होते. ढोल ताशाच्या गजरात लाखो पावले थिरकत होती. ५.४८ वाजलेले असताना लक्ष्मी रस्त्यावरून एक रुग्णवाहिका सायरन वाजवित, गर्दीतून वाढ काढत येत होती. हा प्रसंग रस्त्यावर जमलेल्या लाखो पुणेकरांनी पाहिला. साहजिकच रुग्णवाहिका म्हटल्यावर नागरिक स्वतः बाजूला हटू लागले, मात्र गर्दी जास्त असल्याने रुग्णवाहिकेला वाट मिळण्यास अडचण होऊ लागली, ढोल ताशा पथकेही बाजूला झाली. तेवढ्यात महापालिका सुरक्षा रक्षकांनी माईकद्वारे स्टेजवर घोषणा देणाऱ्या निवेदकांपर्यंत सूचना दिल्या. निवेदकाने माईकदवारे घोषणा केली, आणि काही क्षणातच रस्त्यावरील गर्दी हटली. रस्ता मोकळा झाला आणि रुग्णवाहिका अवघ्या काही सेकंदातच टिळक चौकातून पुढे निघून गेली. त्यानंतर ६.१८ वाजता केळकर रस्त्यावरून याच पद्धतीने आलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिकेलाही नागरिकांनी वाट करून देत माणुसकीचे दर्शन घडविले.
.............
90671

Web Title: Todays Latest Marathi News Pne22g09092 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..