खंडपीठासाठी कृती समितीच्या स्थापनेचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडपीठासाठी कृती समितीच्या स्थापनेचा निर्णय
खंडपीठासाठी कृती समितीच्या स्थापनेचा निर्णय

खंडपीठासाठी कृती समितीच्या स्थापनेचा निर्णय

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्याच्या मागणीसाठी कायमस्वरूपी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) बैठकीत घेण्यात आला. खंडपीठ पुण्यात होण्यासंबंधीची पुढील दिशा या समितीमार्फत ठरवण्यात येणार असून, पुन्हा एकदा ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

खंडपीठाच्या प्रलंबित मागणीबाबत आयोजित करण्यात आलेल्या बारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. अहमदखान पठाण, ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. सुधाकर आव्हाड, डी. डी. शिंदे, पीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, उपाध्यक्ष अ‍ॅड. विवेक भरगुडे, अ‍ॅड. लक्ष्मण येळे-पाटील, सचिव अ‍ॅड. अमोल शितोळे, सचिव अ‍ॅड. सुरेखा भोसले, अ‍ॅड. प्रथमेश भोईटे, अ‍ॅड. शिल्पा कदम उपस्थित होते. अ‍ॅड. थोरवे यांनी कायमस्वरूपी कृती समितीची गरज असल्याचे सांगितले. तसेच ही कृती समिती लवकर जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी अ‍ॅड. आव्हाड, अ‍ॅड. निंबाळकर, अ‍ॅड. पठाण व अ‍ॅड. उमाप यांनी याविषयी मार्गदर्शन केले.