
कागदपत्रांच्या फेरफारीमध्ये डॉक्टर दोषी कसे?
पुणे, ता. १९ : मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणानंतर झालेल्या वैद्यकीय गुंतागुंतीला डॉक्टरांना जबाबदार धरले जाऊ शकते. पण, मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणात मूत्रपिंड देणारा आणि घेणारा या दोघांचीही प्रकृती व्यवस्थित आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून हे प्रत्यारोपण झाले, यात डॉक्टरांना दोषी धरता येणार नाही, असा सवाल ‘इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लँटेशन’ (आयएसओटी) आणि ‘द इंडियन सोसायटी ऑफ नेप्रॉलॉजी (आयएसएन) यांनी उपस्थित केला आहे.
रूबी हॉल क्लिनिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारावर झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या पार्श्वभूमिवर या दोन्ही संस्थांनी ही भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत ‘आयएसओटी’चे सचिव डॉ. विवेक कुटे म्हणाले, ‘‘रूबी हॉल क्लिनिकमधील प्रकरणात मूत्रपिंडरोग तज्ज्ञ आणि शल्यचिकित्सक या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. देशातील ‘मानवी अवयव व पेशी प्रत्यारोपण कायदा’ यात प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत डॉक्टरांची नेमकी भूमिका स्पष्ट केले आहे. प्रत्यारोपणासाठी अवयव प्रत्यारोपणाची मान्यता, वैद्यकीयदृष्ट्या रुग्ण आणि दाता दोन्ही व्यवस्थित असणे या महत्त्वाच्या गोष्टी असतात. तिसरी म्हणजे, त्या दोघांमध्ये असलेले नातेसंबंध. यात डॉक्टरांची भूमिका फक्त वैद्यकीयदृष्ट्या रुग्ण प्रत्यारोपणासाठी दाता आणि ग्राही योग्य आहे का, हे बघण्याचा भाग डॉक्टरांकडे आहे. नातेसंबंध चुकीचे दाखवून प्रत्यारोपण केले जात असल्याचे आता या घटनांमधून पुढे आले आहे. आधार कार्ड, लग्नाचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे त्यासाठी महत्त्वाची ठरतात. ही कागदपत्रे तपासण्याचे, त्याची पडताळणी करण्याचे काम डॉक्टरांचे नाही.”
मूत्रपिंड देणारा किंवा प्रत्यारोपित केलेल्या रुग्णांमध्ये गुंतागुंत निर्माण झाले. त्यात रुग्ण दगावला, अशा वेळी डॉक्टरांना दोष दिला जाऊ शकतो. अवयवदान करणाऱ्या व्यक्तीने कागदपत्रांमध्ये केलेल्या फेरफारीमध्ये डॉक्टरांना दोषी धरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22g35847 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..