पोलिसांना धक्काबुक्कीप्रकरणी बिबवेवाडीत एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांना धक्काबुक्कीप्रकरणी
बिबवेवाडीत एकास अटक
पोलिसांना धक्काबुक्कीप्रकरणी बिबवेवाडीत एकास अटक

पोलिसांना धक्काबुक्कीप्रकरणी बिबवेवाडीत एकास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः दुचाकी घसरून पडलेल्या दुचाकीस्वार महिलेला मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांना एकाने शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील व्हीआयटी होस्टेल चौकात घडली.

अनिकेत गोकूळ केंदळे (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई सागर शिंदे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत सोमवारी सायंकाळी बिबवेवाडीत वाहतुकीचे नियमन करीत होते. त्यावेळी एका महिलेची दुचाकी घसरून त्या खाली पडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. त्यावेळी अपघातग्रस्त महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादी शिंदे व त्यांच्यासमवेतच्या महिला पोलिस कर्मचारी अपघातग्रस्त महिलेस उचलून रस्त्याच्या बाजूला घेत होते. त्यावेळी केंदळे याने फिर्यादीस ‘अपघातग्रस्त महिलेस अन्य महिला उचलतील, तुम्ही का उचलत आहात’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. दरम्यान, फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त महिलेस रिक्षामध्ये बसवून उपचारांसाठी रुग्णालयात पाठवून दिले. त्यानंतरही केंदळे व त्याच्यासमवेत असलेल्या दोन महिलांनी रस्त्यातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘तुम्हाला माझा हिसका दाखवितो, मी इथला भाई आहे'' अशी धमकी देत ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करीत असल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नेले जात होते. त्यावेळी संबंधित महिलांनी पोलिसांना अटकाव करीत सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियांका निकम करीत आहेत.
---------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22g38057 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top