न्यू क्राफ्ट सिल्क इंडियाच्या प्रदर्शनाला ‘सोनल’मध्ये प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू क्राफ्ट सिल्क इंडियाच्या प्रदर्शनाला ‘सोनल’मध्ये प्रारंभ
न्यू क्राफ्ट सिल्क इंडियाच्या प्रदर्शनाला ‘सोनल’मध्ये प्रारंभ

न्यू क्राफ्ट सिल्क इंडियाच्या प्रदर्शनाला ‘सोनल’मध्ये प्रारंभ

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : देशाच्या विविध भागांतील कारागिरांनी फेस्टिव्हल सीझनमधील मागणीची पूर्तता करण्यासाठी ''सिल्क इंडिया- स्पेशल कलेक्शन'' या विषयास अनुसरून ‘न्यू क्राफ्ट सिल्क इंडिया’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८. ३० दरम्यान कर्वे रस्त्यावरील गरवारे कॉलेजजवळील सोनल हॉल येथे हे प्रदर्शन खुले असेल.
या प्रदर्शनाचे आयोजक ओरिसा आर्ट आणि क्राफ्ट आहे. विविध राज्यांतील विणकरांनी विणलेल्या विविध प्रकारच्या साड्या जसे बनारसी, गढवाल, धरमवरम, जमदानी, जमावर आणि संबलपुरीचा यात समावेश आहे. याशिवाय वेगवेगळ्या राज्यांतील फॅशन व विविध ज्वेलरीही आहेत. या प्रदर्शनाद्वारे १४ राज्यांतील विणकरांच्या ५० हजारांपेक्षा अधिक उत्कृष्ट प्रकारच्या कलाकृती असणारे कपडे तसेच वस्तू प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनाचे आयोजक मानस आचार्य यांनी म्हटले की, प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट विणकरांना प्रोत्साहित करणे आणि हँडलूम उद्योगाला बाजारपेठ मिळवून देणे, हे आहे.