क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ट्रॉफीक प्लॅनर नेमावेत ः बागूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर 
ट्रॉफीक प्लॅनर नेमावेत ः बागूल
क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ट्रॉफीक प्लॅनर नेमावेत ः बागूल

क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ट्रॉफीक प्लॅनर नेमावेत ः बागूल

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : शहराच्या वाहतुकीबाबत नियोजनाचा मास्टर प्लॅन तयार असणे अनिवार्य आहे. मात्र, सद्यस्थितीत बिकट बनलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने काही उपाययोजना हाती घेणे शक्य आहे. त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर तातडीने स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनरची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागूल यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

सध्याच्या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार, विद्यार्थी अशा सर्व वर्गांचे हाल होत आहे. वेळेचा अपव्यय होत असल्याने मनस्तापाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अनास्था यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न जटिल झाला आहे. त्यातून तत्काळ दिलासा देण्यासाठी अरुंद रस्त्यांसह शहरातील सर्वच रस्त्यांवर चारचाकी वाहनांना पार्किंगला अटकाव घालणे, अतिक्रमण विरहित फुटपाथ, आवश्यक तिथे एकेरी मार्गाची आखणे, क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर वाहनतळांची निर्मिती करणे आणि ट्रॅफिक प्लॅनर नेमणे आदी विविध उपाययोजना करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी पत्रात म्हंटले आहे.