कॉर्पोरेट कल्चरवरील लिखाणाचा मराठीत अभाव लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत,‘क्षितीज आणि किनारा’चे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉर्पोरेट कल्चरवरील
लिखाणाचा मराठीत अभाव 
लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत,‘क्षितीज आणि किनारा’चे प्रकाशन
कॉर्पोरेट कल्चरवरील लिखाणाचा मराठीत अभाव लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत,‘क्षितीज आणि किनारा’चे प्रकाशन

कॉर्पोरेट कल्चरवरील लिखाणाचा मराठीत अभाव लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत,‘क्षितीज आणि किनारा’चे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः आजच्या काळात शहरी किंवा कॉर्पोरेट कल्चरवरील लिखाणाचा मराठी साहित्यात अभाव आहे. परदेशातील नोकरी, शिक्षण अशा विविध कारणांमुळे शहरातील नागरिकांचे नाते हे जगाशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे भाषेचाही यावर परिणाम दिसून येतो. मराठी साहित्यात ग्रामीण भागातून स्थलांतरित होणारे किंवा शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनावर आधारित लेखन बऱ्यापैकी दिसून येते. परंतु त्या तुलनेने कॉर्पोरेट जगतातील घडामोडींशी संबंधित गोष्टी आजही मराठी साहित्यापासून दूर आहेत, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्‍यक्त केले.
दिलीपराज प्रकाशनातर्फे वैशाली फाटक-काटकर लिखित ‘क्षितीज आणि किनारा’ या कादंबरीचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी लेखक आणि माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे, लेखिका वैशाली फाटक-काटकर आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, ‘‘कॉर्पोरेट जगतातील अनुभवविश्व हे त्या कॉर्पोरेट वर्तुळापुरतेच मर्यादित न राहता, त्या अनुभवांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे. ते अनुभवविश्व मराठी साहित्यात प्रतिबिंबित झाले पाहिजे.’’
कॉर्पोरेट क्षेत्राचे जग हे फार वेगळं नाही. त्यातही आपल्याला समाजाची प्रतिमा दिसून येते. अलीकडे प्रत्येकाच्या जीवनावर डिजिटल संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. कॉर्पोरेट जगातील विविध पैलू हे सर्वांपर्यंत सहज पोचणे आवश्‍यक आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील या जगाची माहिती मिळावी, यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. मात्र, सध्याची शिक्षण पद्धत आणि कॉर्पोरेट क्षेत्र ही रेल्वेच्या रुळांसारखी असून, ते कधीच एकत्र येताना दिसत नाही. त्यामुळे मराठी साहित्याच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे डॉ. शिकारपूर यांनी सांगितले.
यावेळी लेखिका वैशाली काटकर यांनी पुस्तक लिखणामागील भूमिका मांडली. मधुर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
फोटोः 99356