आण्विक तंत्रज्ञानावरील पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आण्विक तंत्रज्ञानावरील पुस्तकाचे प्रकाशन
आण्विक तंत्रज्ञानावरील पुस्तकाचे प्रकाशन

आण्विक तंत्रज्ञानावरील पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः डॉ. नीलिमा राजूरकर लिखित ‘न्यूक्लिअर ॲनालिटिकल टेक्निक्स’ या आण्विक तंत्रज्ञानावरील पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. सेंटर फॉर मटेरिअल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचे (सी-मेट) माजी महासंचालक प्रा. डी. पी. अमळनेरकर यांच्या हस्ते आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅनॅलिटिकल सायंटिस्टचे (आयएसएएस) सचिव प्रा. अविनाश कुंभार या वेळी उपस्थितीत होते.

आयएसएएस पुणे चॅप्टरने प्रा. एच. जे. आर्णीकर ट्रस्ट यांच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मॉरिशस गोल्ड कोस्ट रिफायनरी मुख्य शास्रज्ञ डॉ. कुमारी दिम्या उपस्थित होत्या. डॉ. राजूरकर यांनी ‘न्यूट्रॉन अ‍ॅक्टिव्हेशन अ‍ॅनालिसिस’ हे उपयुक्त रेडिओ अ‍ॅनालिटिकल तंत्र या विषयावर व्याख्यान दिले. पदार्थाचे विश्लेषण करण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा पुस्तकात ऊहापोह करण्यात आला असून, विज्ञान शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शाखेच्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. डॉ.अनुपा कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आयेशा खान यांनी आभार मानले.