‘महाराजा शिवछत्रपती’च्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी सहस्रबुद्धे, कुबेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महाराजा शिवछत्रपती’च्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी सहस्रबुद्धे, कुबेर
‘महाराजा शिवछत्रपती’च्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी सहस्रबुद्धे, कुबेर

‘महाराजा शिवछत्रपती’च्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी सहस्रबुद्धे, कुबेर

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’चे अध्यक्ष डॅा. विनय सहस्रबुद्धे व साकेत कम्युनिकेशन्स या जाहिरात संस्थेचे प्रमुख विनीत कुबेर यांची एकमताने निवड करण्यात आली.
विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन तसेच नव्वद वर्षीय आनंदराव कंग्राळकर यांच्या निवृत्तीमुळे विश्वस्त मंडळावरील दोन जागा रिक्त झाल्या होत्या. बैठकीत अमृत पुरंदरे, जगदीश कदम, अरविंद खळदकर, सुनील मुतालिक व श्रीनिवास वीरकर आदी सदस्य उपस्थित होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव येथे ४३२ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ या प्रकल्पाच्या पहिल्या भागाचे लोकार्पण याच वर्षात करण्यात येणार असून ते नागरिकांना पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे. तसेच २ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ‘जाणता राजा’ या महानाट्याचे सादरीकरण दिल्ली येथे लाल किल्ल्याच्या प्रांगणात होणार असल्याचे यावेळी विश्वस्त मंडळातर्फे जाहीर करण्यात आले.