सोफोश, अरुण-आश्रयमध्ये चार बालके दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोफोश, अरुण-आश्रयमध्ये चार बालके दाखल
सोफोश, अरुण-आश्रयमध्ये चार बालके दाखल

सोफोश, अरुण-आश्रयमध्ये चार बालके दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः सोफोश आणि अरुण-आश्रय या संस्थांच्या ताब्यात दोन मुले आणि दोन मुली आल्या आहेत. त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु, येत्या ३० दिवसांत त्यांचा संपर्क न झाल्यास संबंधित मुलांचा बालकल्याण समितीमार्फत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अवंतिका या दीड वर्षांच्या मुलीला तिची आई प्रज्ञा सागर थोरात यांनी २७ जुलै २०२१ रोजी बालकल्याण समितीमार्फत सोफोशमध्ये दाखल केले. मात्र, प्रज्ञा यांच्याशी आता संपर्क होत नसल्याने कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. अवंतिकाच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. लक्ष्मी या ५ वर्षांच्या मुलीला इंदापूर पोलिस ठाण्यामार्फत बालकल्याण समितीमार्फत सोफोशमध्ये दाखल केले आहे. ती कुटुंबियांची माहिती सांगू शकत नाही. श्रेयश हा १० दिवसांचा मुलगा आंबेगाव बुद्रूकमध्ये एका टेंपोत १६ जुलै रोजी सापडला आहे. तर, नकुल हा चार वर्षांचा मुलगा पोलिसांना पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात १९ सप्टेंबर रोजी सापडला. त्यालाही बालकल्याण समितीमार्फत अरुण-आश्रय संस्थेत दाखल केले आहे. या चारही मुलांबाबत संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांना केले आहे.