पोलिस शिपायांची ११ हजार पदे भरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस शिपायांची
११ हजार पदे भरणार
पोलिस शिपायांची ११ हजार पदे भरणार

पोलिस शिपायांची ११ हजार पदे भरणार

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः कोरोनानंतर रखडलेल्या पोलिस भरतीला पुन्हा एकदा सुरवात होणार आहे. राज्य पोलिस दलातील शिपाई संवर्गातील सुमारे ११ हजार ४४३ पदे भरतीसाठी आता उपलब्ध झाली असून, या संबंधीचे परिपत्रक गृह विभागाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
पोलिस शिपाई, वाहन चालक आणि सशस्र पोलिस शिपाई संवर्गातील ही भरती २०२१ मधील आहे. वित्त विभागाने नव्या आकृतीबंधाला मंजुरी दिल्यानंतर ही पदभरती पार पडेल, अशी माहिती गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील वगळता उर्वरित पदे ५० टक्के भरण्याची अनुमती देण्यात आली आहे. मात्र सद्यःस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असून, सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता होती. त्याच अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेत पोलिस भरतीला मान्यता दिल्याचे गृह विभागाने परिपत्रकात म्हटले आहे.