शहर, परिसरात आज हलक्या सरींची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहर, परिसरात आज 
हलक्या सरींची शक्यता
शहर, परिसरात आज हलक्या सरींची शक्यता

शहर, परिसरात आज हलक्या सरींची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः सध्या शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी शहर व परिसरात ऊन-सावलीचा खेळ सुरूच आहे. सोमवारी (ता. १७) शहर व परिसरात दुपारनंतर सामान्यतः ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

शहरात रविवारी (ता. १६) उन्हाचे सावट कायम होते. तर अधूनमधून ढगाळ वातावरणाची ही अनुभूती झाली. दरम्यान शहरातील कमाल तापमानात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने सरासरीपेक्षा घट होत आहे. रविवारी शहरात २८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात ३ अंशांनी घट झाली होती. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत (ता. १८) पुणे व परिसरात दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात परतीचा पाऊस सुरू असून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून मॉन्सून परतला आहे. तर सोमवारी (ता. १७) राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला. उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्र ते केरळ किनारपट्टी येथे चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. तसेच मंगळवारपर्यंत (ता. १८) बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

असा असेल पावसाचा अंदाज
- सोमवार (ता. १७) ः पुणे, रायगड, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ
- मंगळवार (ता. १८) ः सांगली, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, रत्नागिरी, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, बीड, जालना, नांदेड, लातूर
- बुधवार (ता. १९) ः उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, बीड, लातूर