दिवाळीसाठी पुणे-अजनी एसी रेल्वे धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीसाठी पुणे-अजनी एसी रेल्वे धावणार
दिवाळीसाठी पुणे-अजनी एसी रेल्वे धावणार

दिवाळीसाठी पुणे-अजनी एसी रेल्वे धावणार

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-अजनी दरम्यान विशेष एसी रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान धावणार आहे. दर मंगळवारी पुण्याहून दुपारी तीन वाजून १५ मिनिटांनी निघेल. अजनीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४वाजून ५० मिनिटांनी पोचेल. तर अजनी-पुणे एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी अजनी हुन सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी निघेल. या गाडीला दौंड कॉड लाइन, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या स्थानकांवर थांबा देण्यात आला. गाडीला १३ एसी कोच जोडण्यात आले. रविवार पासून गाडीच्या आरक्षणास सुरुवात झाली.