सोने-चांदीच्या पेठा झगमगल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोने-चांदीच्या पेठा झगमगल्या
सोने-चांदीच्या पेठा झगमगल्या

सोने-चांदीच्या पेठा झगमगल्या

sakal_logo
By

स्वारगेट, ता. १७ ः दसऱ्यापाठोपाठ आलेल्या दिवाळीमुळे सोने-चांदीच्या पेठ झगमगल्या आहेत. दिवाळीत आनंदाला तोटा नसल्याने सोन्याचे भाव भले की फार उतरलेले नसले तरी सराफा बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. खरेदीत महिला वर्ग आघाडीवर असून नेकलेस, बांगड्या आणि मंगळसूत्राला नेहमीप्रमाणे पसंती मिळत आहे. तर चांदीचे नाणे खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल आहे.

दिवाळीला दागदागिन्यांची मोठी खरेदी होत असल्याने सराफा बाजारात मोठे चैतन्य असते. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे, सणानिमित्त आपल्या स्नेहींना भेट देणे अशा कारणांसाठी मोठी खरेदी होत असते. तसेच दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना मिळालेले बोनस, खरेदीसाठी आकर्षक योजना-सवलती यामुळे सोने खरेदीत मोठी वाढ झाली असल्याचे सराफा व्यवसायिकाने सांगितले. तसेच लक्ष्मीपूजनाला मौल्यवान धातूच्या नाण्यांची पूजा केली जात असल्याने नाण्यांची मागणीही वाढली असून सोन्यापेक्षा चांदीच्या नाणे खरेदीला ग्राहकांचे प्राधान्य असल्यानेही सराफा व्यावसायिकाकडून सांगण्यात आले.

ंयंदाही नेकलेस, बांगड्या आणि मंगळसूत्र खरेदीकडेही दरवर्षीप्रमाणे अनेकांचा कल आहे. लाँग आणि शॉर्ट नेकलेस अशा दोन्ही प्रकारांना महिलांची पसंती आहे. बांगड्यामध्ये पाटल्या, तोडे, कडे आदी प्रकारांना आवडीनुसार मागणी आहे. मंगळसूत्रात मोठ्या व लांब मंगळसूत्रांचा ट्रेंड आला आहे. काही महिला हातात ब्रेसलेट स्वरूपात मंगळसूत्र घालतात. त्यातील नवीन, आकर्षक, नाजूक डिझाईन्स बाजारात आले आहेत. डायमंडमध्ये कानातले, ब्रेसलेट, अंगठ्या आदींना मागणी आहे. तर, प्लॅटिनममध्ये लव्ह बँड, चेन, ब्रेसलेट, अंगठी याला मागणी आहे.

दिवाळीनिमित्ताने नागरिक एकमेकांना भेटवस्तू देतात. त्यासाठी चांदीच्या शोभेच्या मूर्ती, ताटे, समया, पैंजण, पूजेचे साहित्य आदींना मागणी आहे.
- अतुल अष्टेकर, अष्टेकर ज्वेलर्स

आमच्याकडे मोल्ड १०० वर्षांचे असल्याने सोन्याच्या दागिन्याला वेगळेपण येते. सुबकता येते, डिझाइनला खोली येते. त्यामुळे तो दागिना उठून दिसतो. म्हणून आमच्या पीएनजी ज्वेलर्सला ग्राहकांची मोठी मागणी असते.
- सौरभ गाडगीळ, पीएनजी ज्वेलर्स

आमच्याकडे दागिन्यांचे अनेक प्रकार उपलब्ध असून त्यात सुबक डिझाईन व आम्ही स्वतः तयार केलेल्या काही युनिक डिझाईन उपलब्ध आहेत. खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
- दिलबाग सिंग, नीळकंठ ज्वेलरी


ग्राहकांची पसंती
- लाँग, शॉर्ट नेकलेस
- पाटल्या, तोडे
- मंगळसूत्रांचे आकर्षक डिझाइन
- प्लॅटिनमचे दागिने, डायमंडचे दागिने