गावठी कट्टा बाळगणाऱ्यास कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावठी कट्टा बाळगणाऱ्यास कोठडी
गावठी कट्टा बाळगणाऱ्यास कोठडी

गावठी कट्टा बाळगणाऱ्यास कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस बेकायदा जवळ बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका सराईताला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ऋतिक कैलास ऐखंडे (वय २२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मुळशी तालुक्यातील बावधन परिसरातील बंगलोर-मुंबई महामार्गालगत ही घटना घडली. बंगलोर-मुंबई महामार्गालगत ऐखंडे हा बेकायदा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जवळ बाळगून असताना पोलिसांना मिळून आला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.