पुण्यातून बारा जणांचे मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातून बारा जणांचे मतदान
पुण्यातून बारा जणांचे मतदान

पुण्यातून बारा जणांचे मतदान

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणुकीत शहरातील बारा ब्लॉकमधून प्रदेश कॉंग्रेसवर प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवडून गेल्या पुण्यातील बारा जणांनी सोमवारी मुंबईत जाऊन मतदान केले. अध्यक्ष पदासाठी असलेल्या दोन उमेदवारांपैकी मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्राचे काही काळ प्रभारी होते. त्यामुळे पुण्यातून त्यांना मतदान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षाच्या रचनेनुसार प्रत्येक ब्लॉकमधून एक प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून प्रदेश कॉंग्रेसवर प्रतिनिधी म्हणून निवडला जातो. पुणे शहरात बारा ब्लॉक असून प्रत्येक ब्लॉकमधून प्रदेशावर निवडून गेलेले बारा प्रतिनिधी आहेत. मुंबई येथील प्रदेश काँग्रेसचे मुख्यालयात सोमवार (ता. १७) सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत हे मतदार झाले. काँग्रेस कमिटीने दिलेले बारकोड असलेले ओळखपत्र तसेच फोटो ओळखपत्राची तपासणी करूनच मतदाराला प्रवेश देण्यात आला. पुण्यातून प्रदेशावर निवडून आलेल्या बारा जणांनी मुंबईत जाऊन मतदान केले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे व शशी थरूर हे दोन उमेदवार आहेत. थरूर यांनी पुण्यातील मतदारांशी फोनवरून संपर्क साधला होता. तर खर्गे यांनी पूर्वी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम पाहिले. त्यामुळे पुण्यातील मतदारांशी त्यांचा चांगला संबंध आहे. त्यामुळे खर्गे यांना पुण्यातून मतदान झाले असावे, अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे.