करिअर व जॉब फेअर यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करिअर व जॉब फेअर यशस्वी
करिअर व जॉब फेअर यशस्वी

करिअर व जॉब फेअर यशस्वी

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : एसआयआयएलसी व आयआरईएफ यांच्यातर्फे शनिवारी (ता. १५) सकाळ नगर येथे ‘करिअर व जॉब फेअर’ संपन्न झाला. प्राधान्यतः सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी व रिअल इस्टेट क्षेत्रातील प्लेसमेंटसंबंधी याचे आयोजन करण्यात आले होते.
‘एसआयआयएलसी’चे सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कौशल्य आधारित शिक्षण व थेट इंडस्ट्रीच्या सहभागाने प्रात्यक्षिक शिक्षण यामुळे ‘एसआयआयएलसी’तर्फे घेतली जाणारी सर्व प्रशिक्षणे, कार्यशाळा व प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांना नोकरी देणारे व स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणारे ठरले आहेत. आयआरईएफच्या मदतीने घेतल्या जाणारा ‘रिअल इस्टेट मार्केटिंग व मॅनेजमेंट’ हा ट्रेनिंग प्रोग्रॅम तर उमेदवारांना थेट नोकरी देणारा आहे. याचा उपस्थित सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन बिरारी यांनी केले. आयआरईएफचे संस्थापक संचालक अभय कुमार यांनी रिअल इस्टेटमध्ये कुशल उमेदवारांची सध्या गरज मोठ्या प्रमाणात आहे. या क्षेत्रातील कंपन्यांना असे कुशल उमेदवार पुरवण्याचे काम या प्रोग्रॅमद्वारे आम्ही करणार आहोत असे सांगितले.
यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या व त्यांपैकी १४ विद्यार्थ्यांची खात्रीशीर प्लेसमेंट देणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी निवड करण्यात आली. या ‘करिअर व जॉब फेअर’साठी रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीला असणाऱ्या नाईकनवरे डेव्हलपर्स, रिलेशन रियल टेक, प्रॉप बायिंग, रेडो कन्सल्टिंग एलएलपी या कंपन्यांनी उपस्थिती दर्शवली. या जॉब फेअरला उपस्थित न राहिलेल्या उमेदवारांसाठी येत्या शुक्रवारी (ता. २१) ऑनलाइन पद्धतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती घेऊन त्यांची निवड करण्यात येईल. याचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ८४८४९२६४७५.

या जॉब फेअरमुळे कुशल उमेदवारांना थेट आमच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे हे दोघांसाठीही फायद्याचे आहे. या अभिनव भारती मोहिमेसाठी मी एसआयआयएलसी व आयआरईएफ दोघांचेही अभिनंदन करतो.
- उदयन माने, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रॉप बायिंग