करिअरची दिशा ठरविण्याचे मिळाले ‘बायजूज’मुळे बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करिअरची दिशा ठरविण्याचे मिळाले ‘बायजूज’मुळे बळ
करिअरची दिशा ठरविण्याचे मिळाले ‘बायजूज’मुळे बळ

करिअरची दिशा ठरविण्याचे मिळाले ‘बायजूज’मुळे बळ

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : ‘ही परीक्षा सोपी आणि वेगळीच होती’, ‘आता फक्त गुण नाही, माझ्या क्षमताही कळतील’... शनिवारी आणि रविवारी झालेल्या बुद्धिमापन चाचणीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह परीक्षेनंतर अशा प्रतिक्रियांतून ओसंडून वाहत होता. पुण्याच्या विविध भागांतील ‘बायजूज ट्यूशन सेंटर्स’वर इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने बुद्धिमापन चाचणीत सहभागी झाले होते.
आपल्या पाल्याच्या करिअरबाबत जागरूक असणाऱ्या पालकांनीही चाचणी सुरू असताना ‘बायजूज’च्या समुपदेशकांशी संवाद साधला. शालाबाह्य जगामध्ये आवश्यक असलेली कौशल्ये, तार्किक मूल्यमापनाची क्षमता आणि पाल्याची आवड जाणून घेत करिअरची दिशा ठरविण्यासाठी बुद्धिमापन चाचणी उपयुक्त ठरते, यावर पाल्य आणि पालकांचे एकमत होते.
विद्यार्थ्यांचा कल, आवड आणि क्षमतांचा विचार करत त्या-त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्यावर पालक भर देत आहेत. हे निर्णय घेताना बुद्धिमापन चाचणी मोलाची ठरते. ‘बायजूज’ची बुद्धिमापन चाचणी म्हणजे ‘विद्यार्थ्यांसाठी आणखी एक परीक्षा’ नाही. शाळेच्याच अभ्यासक्रमावर आधारित, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने पाल्याच्या क्षमता जाणून घेण्यासाठी सोप्या प्रकारे ही परीक्षा आयोजित केली जाते. गणित आणि विज्ञान या विषयांवर आधारलेल्या ‘बायजूज’च्या बुद्धिमापन चाचणीत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला १५ पानी सखोल विश्लेषणात्मक अहवाल दिला जाणार आहे. शास्त्रशुद्ध निकषांवर तयार केलेल्या या अहवालामुळे शाळेत असतानाच पाल्याच्या क्षमतांची कल्पना पालकांना येईल. त्यामुळे पुढील योग्य दिशा वेळीच निश्चित करता येईल, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

पुणे शहरात बुद्धिमापन चाचणीला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे करिअरसाठीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करायचे, हेच आमचे उद्दिष्ट आहे आणि यासाठी लवकरच ही बुद्धिमापन चाचणी संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोचवणार आहोत.
- हिमांशू बजाज,
बिझनेस हेड, बायजूज ट्यूशन सेंटर

काय येते आहे आणि आपण नेमके कोठे कमी पडतो, हे तपासण्याची ही सुवर्णसंधी मला या बुद्धिमापन चाचणीच्या निमित्ताने मिळाली. म्हणून मी ही चाचणी देण्याचा निर्णय घेतला आणि चाचणी दिल्यानंतर योग्य निर्णय घेतल्याची माझी भावना आहे.
- अभय पगारे, विद्यार्थी

मी पाचवीत शिकतो. या चाचणीत सोपे व कठीणही प्रश्न होते. गणित व विज्ञानाविषयी असलेले सर्व प्रश्न सोडविले. मला शिकून खूप मोठे व्हायचे आहे. ‘बायजूज’मध्ये साध्या व सोप्या पद्धतीने शिकविले जाते. मला येथे प्रवेश घ्यायचाच आहे.
- नकुल संतोष हगवणे, विद्यार्थी

मुलाला ऑनलाइन शिक्षणाची आवड आहे. कलचाचणीबाबत जाहिरात पाहिली आणि ही परीक्षा देण्याचा निर्णय त्याने घेतला. या चाचणीतून एकप्रकारे मूल्यमापन करण्याची चांगली संधी मिळाली.
- नीलेश गारगोटे, पालक

प्रत्येक पालकाप्रमाणेच आम्हीही दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुढे काय शिकायचे, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, हा निर्णय मुलाचाच असेल. तो निर्णय घेण्यासाठी या चाचणीचा उपयोग होईल.
- मीरा धुरी, पालक