ओला कॅब चालकास दमदाटी करीत मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओला कॅब चालकास दमदाटी करीत मारहाण
ओला कॅब चालकास दमदाटी करीत मारहाण

ओला कॅब चालकास दमदाटी करीत मारहाण

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः खासगी कॅब चालकाची कार अडवून एकाने चालकास शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या घटनेत चालकाचा दात तुटून ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी प्रतीक दादासाहेब रणवरे (वय २२, रा.सद्‌गुरु रेसिडेन्सी, येवलेवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फिर्यादी प्रतिक रणवरे हे ओला कॅब चालक आहेत. शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते प्रवाशाला घेण्यासाठी जात होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांची कार अडवली. त्यानंतर त्याने फिर्यादीस शिवीगाळ करीत गाडी नीट चालवता येत नाही का, असा जाब विचारीत बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, फिर्यादीच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोनसाखळी संबंधिताने चोरुन नेली. तू कोणाला सांगितले, तर तुला इथे धंदा करू देणार नाही, तुझी गाडी तोडून तुझ्याकडे बघून घेतो’ अशी धमकी देत संशयित आरोपी पळून गेला.