समाजसेवा पुरस्कारांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजसेवा पुरस्कारांचे वितरण
समाजसेवा पुरस्कारांचे वितरण

समाजसेवा पुरस्कारांचे वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : माजी आमदार पुरुषोत्तम चौरे (सासवडकर) यांचा जन्मशताब्दी वर्ष समारोप सोहळा आणि समाजसेवा पुरस्कार वितरण कोरेगाव पार्क येथे पार पडले. नालंदा ग्रंथालय, म्हाडा कॉलनी येरवडा पुणे आणि समस्त चौरे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिवंगत आमदार पू. मा. चौरे समाजसेवा पुरस्कार संजय कांबळे, उल्हास ठकसेन, कश्‍यप साळुंके यांना प्रदान करण्यात आला. तर सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सायली साळवी, प्रियांका चौधरी, संगीता जगताप, वीरेंद्र गायकवाड, संजय गायकवाड यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कश्यप साळुंके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर रजनी त्रिभुवन, माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेविका लता राजगुरू, माजी नगरसेवक प्रदिप गायकवाड, पुणे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे अध्यक्ष शैलेश चव्हाण आणि ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे उपस्थित होते.