पाच सोसायट्यांचा वीज पुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच सोसायट्यांचा वीज पुरवठा बंद
पाच सोसायट्यांचा वीज पुरवठा बंद

पाच सोसायट्यांचा वीज पुरवठा बंद

sakal_logo
By

पुणे. ता. १८ : एनआयबीएम परिसरात सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पाच सोसायट्यांच्या तळमजल्यात अद्यापही पाणी साचलेले आहे. त्यामुळे वीजसुरक्षेला प्राधान्य देत संभाव्य धोका टाळण्यासाठी महावितरणकडून या पाचही सोसायट्यांचा वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवला आहे.
एनआयबीएम परिसरातील साईदर्शन, द लॅटीट्यूड, अर्चना कॅसल, ब्रम्हा मॅजेस्टिक व मनीष प्लाझा, अशी या सोसायट्यांची नावे आहेत. या सोसायट्यांमधील साचलेले पाणी काढण्याचे काम सुरू आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतर वीजयंत्रणेची पाहणी करून रात्री उशिरा या सोसायट्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.