पर्यावरण संवर्धनासाठी ‘रिफिलेबल’ उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण संवर्धनासाठी
‘रिफिलेबल’ उपक्रम
पर्यावरण संवर्धनासाठी ‘रिफिलेबल’ उपक्रम

पर्यावरण संवर्धनासाठी ‘रिफिलेबल’ उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः पुणे शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि एकल वापर प्लॅस्टिकचे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छ’ प्लस सेवा सहकारी संस्था, रिफिलेबल आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने ‘रिफिलेबल’ या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.

उपक्रमाविषयी...
- ‘रिफिलेबल’ सध्या मुंबई, बंगलोर, जोधपूर व सूरत या शहरांमध्ये कार्यरत
- नागरिकांना हानिकारक रसायने मुक्त, नैसर्गिक कपडे धुण्यासाठीचा साबण, फरशी स्वच्छतेसाठीचा साबण, घरगुती साफसफाईसाठीचे डिटर्जंट आदी उपलब्ध करून देणार
-वरील सर्व साहित्य कोणत्याही प्लॅस्टिक पॅकेजिंगच्या वापराविना घरपोच सेवा
- कचरावेचकांनी चालवत आणलेल्या वाहनाद्वारे ही सुविधा सोसायटीमध्ये पोचविणार
- नागरिकांनी जुन्याच बाटली अथवा कंटेनरमधून नवीन डिटर्जंट घेऊन सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर कमी करावा हा यामागील उद्देश

या उपक्रमाचे उद्‍घाटन नुकतेच संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्वच्छ संस्थेचे संचालक हर्षद बर्डे, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, रिफिलेबल इंडियाचे सहसंस्थापक राहुल बत्रा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वच्छ संस्थेचे अमोघ भोंगले यांनी केले.

अविरत कष्ट घेत पर्यावरणासाठी काम करणारे कचरावेचक पुनःचक्रीकरणाद्वारे शाश्वत उपजीविका निर्माण करतात. प्लॅस्टिकचे वाढते उत्पादन व वापरामुळे आलेल्या पर्यावरणीय संकटांवर प्लॅस्टिकचा कचरा निर्मितीच्या ठिकाणीच कमी करून स्वच्छ संस्था प्लॅस्टिक रिसायकलिंगवर अवलंबून असलेल्या कचरावेचकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करते.
- हर्षद बर्डे, संचालक, स्वच्छ संस्था