‘सिंहगड’ला ‘सरपोतदार करंडक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सिंहगड’ला ‘सरपोतदार करंडक’
‘सिंहगड’ला ‘सरपोतदार करंडक’

‘सिंहगड’ला ‘सरपोतदार करंडक’

sakal_logo
By

पुणे, ता.२१ : बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘खंजीर’ या प्रसंगनाट्याला पहिला क्रमांक मिळवत ‘सरपोतदार करंडक’ पटकाविला आहे. तर एमईएस कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या ‘जुगार’ या प्रसंगनाट्याला दुसरा, तर सिंहगड कॉलेजच्या ‘परंपरा’ या प्रसंगनाट्याला तिसरा क्रमांक मिळाला.
बीएमसीसीतर्फे घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे विसावे वर्ष होते. यात ३२ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. अभिनेत्री अक्षया देवधर, ऋचा आपटे आणि विनोद सातव यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांची प्रमुख उपस्थितीत हा समारंभ झाला.
सरपोतदार म्हणाले, ‘‘प्रसंगनाट्य स्पर्धेत आपण थोड्या वेळात काय उत्तम देऊ शकतो, याचा कस लागतो. कमीतकमी वेळात जलद विचार करून उत्तम कल्पना पुढे नेता येते. महाविद्यालयीन वयात गमवायचे काहीच नसते. चुकांमधून अधिकाधिक शिकता येते, अनुभव मिळतो, स्वतःला घडविता येते. वेगळा विचार करून काहीतरी आश्चर्यकारक करा, तर प्रशंसा होऊ शकते, व्यावसायिक रंगभूमीवर यश मिळू शकते.’’

वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे (अनुक्रमे पहिले तीन)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : सोहम आठवले (इंडसर्च), नील देशपांडे (स. प. महाविद्यालय), ओमकार सरदेशपांडे (व्हीआयटी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : श्रावणी धुमाळ (स. प. महाविद्यालय), श्रुती देवधर (कावेरी कॉलेज), श्रीनिधी पवार (सिंहगड कॉलेज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : वरद शिंदे (पीव्हीजी कॉलेज), समर्थ खाडे (सिंहगड कॉलेज), सौमित कारखानीस (गोखले इन्स्टिट्यूट)