खरे, चितळे यांना युवा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरे, चितळे यांना युवा पुरस्कार
खरे, चितळे यांना युवा पुरस्कार

खरे, चितळे यांना युवा पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २१ः इंद्रनील चितळे यांना युवा उद्योजक तर कवी संदीप खरे यांना सृजन युवा कलाकार पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानच्या (युवा) १५ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शनिवारी (ता. २९) पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी पेठेत आयोजित पत्रकार परिषदेला संस्थेचे श्रीकांत जोशी, अजय कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, अभिजित देशपांडे, मंदार महाजन, निकिता संत, मिलिंद दारव्हेकर उपस्थित होते. टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता पार पडणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाणक्य मंडळाचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी हे असणार आहेत. युवा उपक्रमांतर्गत सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार आणि स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार दिला जातो.