मोर्चातील समन्वयकांनी जमाखर्च मांडावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोर्चातील समन्वयकांनी जमाखर्च मांडावा
मोर्चातील समन्वयकांनी जमाखर्च मांडावा

मोर्चातील समन्वयकांनी जमाखर्च मांडावा

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः राज्यामध्ये मराठा समाजाच्या २०१६ मध्ये निघालेल्या क्रांती मोर्चातील समन्वयकांनी जमा-खर्चाचा हिशोब द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे तुषार काकडे यांनी केली आहे. मोर्चातील काही लोकांच्या संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून, तिच्या चौकशीच्या मागणीसाठी काकडे यांनी पत्रकार परिषद घेतली. नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित परिषदेला प्रदिप कणसे, प्रमोद अडसूळ, रूपाली पाटील आदी उपस्थित होते. ठोक मोर्चातील नेत्यांची चौकशी करावी, क्लीपमधील संबंधित व्यक्तींची आणि नातेवाइकांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव सदर ऑडिओ क्लिपमध्ये असल्याने त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कणसे यांनी केली.