चिमुकलीचे अपहरण करून खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकलीचे अपहरण करून खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप
चिमुकलीचे अपहरण करून खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप

चिमुकलीचे अपहरण करून खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : उसने पाच लाख रुपये न दिल्याने चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून, तिचा गळा दाबून खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी दीड लाखाच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.

शुभम विनायक जामनिक (वय २६) आणि प्रतीक ऊर्फ गोलू अरुण साठले (वय २९, दोघेही रा. अकोला) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तनिष्का असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचे वडील अमोल नानासाहेब आरूडे (रा. चऱ्होली बुद्रूक, ता. हवेली) यांनी याबाबत दिघी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विश्‍वास सातपुते यांनी १३ साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी उपनिरीक्षक दत्तात्रेय ननावरे यांनी सरकारी पक्षाला मदत केली. २८ जून २०१७ रोजी वडमुखवाडी, चऱ्होली येथून मुलीचे अपहरण झाले होते. शुभम याने फिर्यादीच्या पत्नीकडे पाच लाख उसने मागितले होते. ते न दिल्याने अपहरण करून चिमुकलीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह बॅगेत घालून मूर्तिजापूर तालुक्‍यातील रसुलपूर येथे चारचाकी वाहनाने नेला व तेथे पेटवून दिला. तो अर्धवट जळालेला मृतदेह पुरून पुरावा नष्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयाने खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या कलमानुसार शिक्षा सुनावली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तिवाद ॲड. सातपुते यांनी केला. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. तर, दंड भरल्यास त्यापैकी दोन लाख रुपये मुलीच्या वडिलांना नुकसान भरपार्इ म्हणून देण्यात येणार आहेत.