मनशक्ती, बालकुमार दिवाळी अंकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनशक्ती, बालकुमार दिवाळी अंकाचे प्रकाशन
मनशक्ती, बालकुमार दिवाळी अंकाचे प्रकाशन

मनशक्ती, बालकुमार दिवाळी अंकाचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः मनशक्ती आणि बालकुमार दिवाळी अंकाचे मराठी विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आणि महाराष्ट्र साहित्य परीषदचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संपादिका वर्षा तोडमल आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनशक्ती प्रयोग केंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी केले. त्यांनी मनशक्ती केंद्राच्या कार्याचा आढावा तसेच भविष्यातील उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात दिली. यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुहास गुधाटे यांनी आभार मानले.