‘टीईटी २०२१’परीक्षेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘टीईटी २०२१’परीक्षेचा निकाल जाहीर
‘टीईटी २०२१’परीक्षेचा निकाल जाहीर

‘टीईटी २०२१’परीक्षेचा निकाल जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेतलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी केवळ ३.६९ टक्के म्हणजेच १७ हजार २८७ उमेदवार पात्र ठरले आहेत.

परीक्षा परिषदेतर्फे पेपर एक (इयत्ता पहिली ते पाचवी गट) आणि पेपर दोन (इयत्ता सहावी ते आठवी गट)चा अंतरिम निकाल https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. पेपर एक आणि दोनसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल टीईटीच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करायची असल्यास ५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा परिषदेकडे विनंती नोंदविता येणार आहे. अन्य पद्धतीने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच निकाल राखीव ठेवलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन ५ नोव्हेंबरपर्यंत mahatet21.msce@gmail.com या ईमेलवर पाठवावे. ५ नोव्हेंबरनंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा, तसेच ईमेल व्यतिरिक्त अन्य मार्गाने आलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्फत पाठविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलेजा दराडे यांनी स्पष्ट केले आहे.

निकालाचा तपशील :
तपशील : उमेदवारांची संख्या
- नोंदणी केलेले : ४,६८,६७९
- परीक्षा दिलेले : ४,०२,०१८
- गैरहजर राहिलेले : ६६,३९७
- पात्र ठरलेले : १७,२८७
- निकाल राखीव ठेवलेले : २,४३३